माटूंग्यातील विकृत 'सिरीयल किसर'ला अटक..  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

मुंबई : माटुंगा रेल्वे स्थानकावर26 जानेवारी रोजी एका तरूणीचा विनयाभंग करणाया विकृत "सिरियल किसर'ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या नराधमावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत, मात्र छेडछाडी बाबत तक्रार देण्यासाठी अद्याप एकही महिला पुढे आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रजीउर खान असे या विकृताचे नाव आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी दुपारी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मुंबई : माटुंगा रेल्वे स्थानकावर26 जानेवारी रोजी एका तरूणीचा विनयाभंग करणाया विकृत "सिरियल किसर'ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या नराधमावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत, मात्र छेडछाडी बाबत तक्रार देण्यासाठी अद्याप एकही महिला पुढे आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रजीउर खान असे या विकृताचे नाव आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी दुपारी सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मोठी बातमी - सावधान! नवी मुंबईत डोक्यावर पडतायत वीजेचे खांब..

ही घटना पाहून कुणालाही धक्का बसेल. पीडित तरुणी माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावरून जात असताना हा प्रकार घडला. पुलावर कोणीही नसल्याचे पाहून एक मनोविकृत तरुण पाठीमागून आला आणि बळजबरीने तिचे चुंबन घेतले. त्यानंतर लगेचच त्याने तिथून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेली तरुणीही तिथून निघून गेली. मात्रा, ही घटना CCTV मध्ये कैद झाली. हे सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायारल होत असून त्या आधारे पोलिसांनी संबंधित विकृताला अटक केली आहे. 

मोठी बातमी - ज्याने कुणी गंठण चोरले असेल, तो उद्याच्या उद्या मरेल..

अटक करण्यात आलेला तरुण विकृत असून त्याने अनेकदा हा प्रकार केल्याचे समजते. या प्रकारामुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 25जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तो एका महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे. यानंतर तो आजुबाजूला कोणी नाही याची खात्रीा करुन घेतो आणि महिलेकडे पाहून अश्‍लिल वर्तन देखील करीत असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर 26 जानेवारीला पुन्हा एकदा त्याच महिलेचा पाठलाग करताना दिसत आहे. यावेळी तो जबरदस्ती तिचा किस घेतो आणि पळ काढतो. माटुंगा रेल्वे स्थानकावरील सहा आणि सात क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मला जोडणाया ब्रीजवर हा प्रकार घडला आहे. हा ब्रीज रात्री सात वाजल्यानंतर निर्मनुष्य असतो त्यामुळे आरोपीने याचा फायादा घेत महिलांचा विनयभंग केला. 
सीसीटीव्हीत दिसत आहे त्याप्रमाणे त्याने आतापयरांत दोन महिलांचा विनयाभंग केला आहे.

मोठी बातमी - शरद पवारांचा मिडास टच, 'त्या' झोपडीचं पक्क्या घरात होणार रूपांतर

महिलांना पोलिसांना अलर्ट केले असले तरी तक्रार दाखल केलेली नाही. पोलिसांना सापळा रचत चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली आहे. त्याची ओळख पटली आहे. मात्रा महिलांनी तक्रार दाखल न केल्याने पोलिस हतबल असुन, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

serial kisser of matunga station arrested by mumbai police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serial kisser of matunga station arrested by mumbai police