‘सिरीयल रेपिस्ट’ नालासोपाऱ्यात

विजय गायकवाड
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

नालासोपारा - मुंबई, नवी मुंबईसह ठाणे ग्रामीण व शहर परिसरातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा ‘सिरीयल रेपिस्ट’ आता नालासोपाऱ्यात सक्रिय झाल्याचे दोन घटनांवरून उघडकीस आले आहे. या नराधमाने चार दिवसांत दोन अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका मुलीने आरडाओरड करत त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली; मात्र दुसऱ्या मुलीवर अत्याचार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नराधमाला पकडण्याचे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.

याप्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात बलात्कार व विनयभंग असे गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपीवर मुंबई, ठाण्यात १०-१२ गुन्हे दाखल आहेत. 

महिला, लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या ‘सिरीयल रेपिस्ट’ला तत्काळ अटक करणे गरजेचे आहे. त्याला पकडण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात यावे. या संदर्भात पालघर पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन मागणी करणार आहे.
- राजेंद्र गावित, खासदार

Web Title: serial-rapiest in Nala Sopara