सीरियल रेपिस्ट अखेर जाळ्यात 

सीरियल रेपिस्ट अखेर जाळ्यात 

नवी मुंबई / वसई - मुंबई, नवी मुंबई आणि नालासोपारा येथे अल्पवयीन मुलींना हेरून त्यांच्याशी अश्‍लील चाळे, अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर असलेल्या विकृत नराधमावर अखेर बुधवारी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने झडप घातली. त्याला मीरा रोड येथील "एस-9' या बारसमोरील रस्त्यावर मुलींची रेकी करताना ताब्यात घेण्यात आले. 

नवी मुंबई पोलिसांनी महत्प्रयासाने गजाआड केलेल्या या आरोपीवर नवी मुंबई पोलिसांचे 25 हजार रुपयांचे बक्षीसही होते. या सीरियल रेपिस्टचा शोध मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पालघर पोलिसही घेत होते. मुंबईसह नवी मुंबई पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी विविध पथके तयार केली होती. रस्त्यावरून फिरणाऱ्या लहान वयाच्या एकट्यादुकट्या मुलींना हेरून त्यांना तो आई-वडिलांनी बोलावल्याच्या थापा मारायचा. त्यानंतर सोबत येणाऱ्या मुलींवर अत्याचार करून तो शहर सोडून जायचा. त्याच्या या गुन्ह्याच्या पद्धतीमुळे तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता; मात्र खारघर, घणसोली व कोपरखैरणे येथे केलेल्या कृत्यांदरम्यान त्याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. नवी मुंबई पोलिसांनी त्यावरून त्याचा शोध सुरू केला होता. नंतर त्याने शहरच बदलल्यामुळे तो पुन्हा पोलिसांच्या जाळ्यापासून दूर गेला होता. याचदरम्यान नालासोपारातील तुळींज भागात केलेल्या गैरकृत्यांमुळे पुन्हा नवी मुंबई पोलिसांचा तपास त्याच्या दिशेने सुरू झाला. त्याला गजाआड केल्यावर त्याच्याकडून विविध ठिकाणी केलेल्या कृत्यांची माहिती घेतली जात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

मोबाईलवरून तपास 
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मोबाईल सिग्नलवरून या नराधमाचा शोध सुरू केला होता. बुधवारी दिवसभर मोबाईल टॉवरच्या सिग्नलवरून तो मीरा रोडमध्ये असल्याचे समजले होते. त्याच्या मागावर गेलेल्या पथकांना तो संध्याकाळी एस-9 परिसरात रस्त्यावर दिसला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com