मुंबईत कोरोनाचे गंभीर रुग्ण अधिक, मृत्युदर कमी करण्यासाठी पालिकेचा प्रयत्न

मुंबईत कोरोनाचे गंभीर रुग्ण अधिक, मृत्युदर कमी करण्यासाठी पालिकेचा प्रयत्न

मुंबई: मुंबईत होणाऱ्या मृत्यूंमध्ये नर्सिंग होम मधील मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नर्सिंग होममध्ये कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यास मनाई करण्यात आली आहे. गंभीर रुग्णांच्या उपचारावर पालिकेनं अधिक लक्ष दिले असून पालिकेच्या DCHIसह मोठ्या रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत.

मुंबईत गंभीर रुग्णांचं प्रमाण 2 टक्क्यांच्या वर आहे. गंभीर रुग्णांची संख्या 13,465 इतकी आहे. त्यांच्यावर डीसीएचआय सेंटर तसंच इतर मोठ्या रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत. 50 वर्षावरील रुग्णांची यात अधिक संख्या असल्याने अशा रुग्णांना होम क्वारंटाईन न करता कोविड सेंटरमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या महिन्यात शहराच्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल 41 टक्के मृत्यू हे खासगी रुग्णालयांमध्ये झाले आहेत. यापैकी बहुतेक मृत्यू नर्सिंग होममध्ये होते. मात्र रुग्ण गंभीर झाल्यानंतर नर्सिंग होममधून रुग्णांना मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात येत असल्यानं अडचणी वाढत होत्या. त्यामुळे पालिकेनं नर्सिंग होम आणि प्रसूतीगृहांना कोविड  रुग्णांना दाखल करण्यास मनाई केली.

महापालिका अधिकारी, राज्य-नियुक्त कोविड टास्क फोर्स आणि शहरातील खासगी रुग्णालयांमधील या छोट्या खासगी सुविधा असलेल्या शहरांच्या मृत्यू मृत्यूच्या दरासाठी मुख्यत्वे जबाबदार असणाऱ्या प्रमुख खासगी रुग्णालयांमधील तज्ज्ञांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. 

डेथ ऑडिटनुसार, या महिन्यात आतापर्यंत शहरातील एकूण मृत्यूंपैकी 41 टक्के मृत्यू खासगी रुग्णालयांत झालेत. मृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने महापालिका आयुक्त आय.एस. चहल आणि महत्त्वाच्या खासगी रुग्णालयांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात बैठकीत मृत्यू नर्सिंग होममध्ये झाले आहेत किंवा त्यांनी रुग्ण गंभीर झाल्यानंतर मोठ्या रुग्णालयात पाठवलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे यात समोर आले आहे.

नर्सिंग होममध्ये सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांना रूग्णालयात उपचार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र रुग्णांशी चर्चा करून किंवा बीएमसीद्वारे चालविण्यात जम्बो सुविधा किंवा मोठ्या खासगी रुग्णालयात पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

बीएमसी आणि शासकीय रुग्णालयांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. असे असताना खासगी रुग्णालयांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे 72 नर्सिंग होममध्ये कोविडची ट्रीटमेंट बंद करण्यात आली असून ही नर्सिंग होम नॉन कोविड उपचारांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

(संपादनः पूजा विचारे)

Serious corona patients more Mumbai municipal efforts reduce mortality rate

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com