

court
मुंबई : 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ (धर्मांतरविरोधी कायदा) अंतर्गत मुंबईत दाखल पहिल्या गुन्ह्यातील २६ वर्षीय तरुणाला मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी (ता. २०) अटकपूर्व जामीन मंजूर केला. तरुणीने बुरखा परिधान केलेले छायाचित्र आणि लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर तिचे बदललेले नाव असणे हे धर्मांतर झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षणही न्यायालयाने जामीन मंजूर करताना नोंदवले.