दुचाकी आणि दोन ऑटोरिक्षाची चोरी करणारी टोळी गजाआड, ७ जण अटकेत

दुचाकी आणि दोन ऑटोरिक्षाची चोरी करणारी टोळी गजाआड, ७ जण अटकेत

मुंबईः शहरात दुचारी आणि ऑटोरिक्षा चोरणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीला पोलिसांनी गजाआड केलं आहे.  खेरवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तांत्रिक अभ्यास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसंच गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीवरुन दुचाकी आणि ऑटोरिक्षा चोरणाऱ्या आणि विकणाऱ्या टोळीतील तब्बल सात जणांना गजाआड केले. त्यांच्याकडून 9 दुचाकी आणि दोन ऑटोरिक्षा हस्तगत करण्यात यश मिळवले.

 खेरवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हाडा कार्यालयासमोर तक्रारदार यांच्या हातातील मोबाईल फोन आणि बजाज पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी हिसकावून घेऊन धूम ठोकली. संबंधित गुन्हा खेरवाडी पोलिस ठाण्यात दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडक कारवाई केली. पोलिसांनी लपलेल्या आरोपी साजिद अन्सारी उर्फ शोहेब आणि नावेद नदीम शेख यांना अटक केली.

त्यानंतर त्यांची चौकशी केल्यानंतर मोबाईल चोरल्यानंतर तो विकत घेणारा मालखाऊ अब्दुल्ला सलीम खान यालाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून अनेक मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल हस्तगत केले. तर अटक आरोपींचा दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याचे समोर आलं.

पोलिसांनी आणखी चौकशी केली असता त्यांचे सहकारी मुदस्सीर खान उर्फ बिंटु , मोइन शेख उर्फ एस. के., मतीन शेख उर्फ पापा आणि रिझवान शेख उर्फ बेछु यांनाही अटक करण्यात आली आहे. मोबाईल आणि दुचाकी चोरीतील अटक सात आरोपींना वाकोला, बंदर, नेहरूनगर, कुर्ला,धारावी, चेंबूर आणि अन्य पोलिस ठाण्यात दाखल असलेले गुन्ह्यात यांचं सहभाग असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याकडून 9 दुचाकी आणि 2 ऑटिरीक्षा हस्तगत केल्या.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Seven arrested stealing two wheeler and autorickshaws mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com