काँग्रेसकडून पीआरपीची सात जागांवर बोळवण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिका निवडणुकीत ‘एकला चलो’चा नारा देत काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. बहुजन मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने पीपल्स रिपब्लिकन पार्टीला (पीआरपी) सोबत घेतले आहे; पण काँग्रेसने पीआरपीने मागितलेल्या २१ पैकी केवळ सात जागांवर बोळवण केली. पहिल्या यादीत पीआरपीच्या तीन उमेदवारांनाच स्थान देण्यात आले आहे. इतर उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली नाही. यामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज असले, तरी पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी शिवसेना-भाजपच्या कचाट्यातून महापालिका सोडवण्यासाठी काँग्रेससोबत तडजोड केली आहे.

शिवसेना-भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. मुंबई महापालिका हद्दीत राष्ट्रवादीचा जम नसला, तरी काँग्रेसला काही प्रमाणात नक्की फायदा झाला असता; मात्र दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. मुंबईतील बहुजन मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने पीआरपीसोबत युती केली आहे. पीआरपीने काँग्रेसकडे २१ जागा मागितल्या होत्या; मात्र काँग्रेसने त्यांना सात जागा देण्याचे मान्य केले आहे. ९१, ९३, २, १६, १२२, १०५ आणि २१० हे वॉर्ड पीआरपीच्या वाट्याला आले आहेत.

प्रचारसभांत भाग घेणार
काँग्रेसने दिलेल्या जागांबाबत पीआरपीचे अध्यक्ष कवाडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे; मात्र शिवसेना, भाजपच्या भ्रष्टाचाराच्या कचाट्यातून महापालिकेला सोडण्यासाठी ही तडजोड केली आहे, असे ते म्हणाले. काही दिवसांत प्रचारसभा सुरू होणार असून मुंबईतील सर्व सभांना हजर राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Seven seats from Congress to PRP