लग्नाची भूलथाप देत तरुणीचे लैंगिक शोषण ; तरुणाला अटक

लग्नाची भूलथाप देत तरुणीचे लैंगिक शोषण ; तरुणाला अटक

खालापूर : लग्नाची भूलथाप देत तरुणीचे दोन वर्षे लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला खालापूर पोलिसांनी अटक केली. प्रशांत प्रकाश पाटील (वय 27, रा. मिरकुटवाडी) असे आरोपीचे नाव आहे. 
त्याने दोन वर्षांपूर्वी त्याच्या वाढदिवसाचे निमित्त सांगून पीडितेला खोपोलीतील फ्लॅटवर बोलावून घेतले. नंतर गुंगीचे औषध मिसळलेले एनर्जी ड्रिंक प्यायला दिले. त्या वेळी पीडितेला गुंगी येताच तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली.

पीडित तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिला घडलेला प्रकार समजला. मात्र, त्या वेळी आरोपी प्रशांतने तिला लग्न करण्याचे वचन दिले. नंतरच्या काळात त्याने लोणावळा, महाबळेश्‍वर, अलिबाग या ठिकाणी पीडितेला नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. याचदरम्यान पीडितेने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नाच्या विषयावर बोलण्यास टाळाटाळ केली. यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्याआधारे प्रशांत पाटील याला अटक करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com