'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'संदर्भात CM ठाकरेंनी दिले महत्त्वाचे निर्देश

विविध जातींच्या सापांचे संग्रहालय तयार करून त्यांची सविस्तर माहिती देण्यात यावी. काळा बिबट्या, पांढरा सिंह, असे आपल्याकडे दुर्मीळ असणारे प्राणी तसेच पक्षी या उद्यानात आणावेत. होलोग्राफिक प्रोजेक्शन असे उपक्रम या उद्यानात राबविण्यात यावेत, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
SGNP
SGNPGOOGLE

मुंबई : पांढरा सिंह, काळ्या बिबट्या असे दुर्मीळ प्राणी लवकरच ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’त पाहायला मिळणार आहेत. तसेच येथे विविध जातींच्या सापांचे संग्रहालयही तयार करण्यात येणार आहे. उद्यानाचा कायापालट करण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनविभागाला दिले आहेत.

SGNP
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या संवेदनशील क्षेत्राचा झोनल मास्टर प्लान पालिका बनवणार

ठाकरे म्हणाले की, “संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये जगातील विविध उद्यानांमधील पर्यटकांना आकर्षित करणारे पशु-पक्षी आणण्यासाठी प्रयत्न करावेत. या उद्यानात पर्यटकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. मुंबईच्या नागरिकांना जगातील उत्कृष्ट उद्यानाचा आनंद घेता येईल असे उपक्रम याठिकाणी निर्माण करण्यात यावेत”.

विविध जातींच्या सापांचे संग्रहालय तयार करून त्यांची सविस्तर माहिती देण्यात यावी. काळा बिबट्या, पांढरा सिंह, असे आपल्याकडे दुर्मीळ असणारे प्राणी तसेच पक्षी या उद्यानात आणावेत. होलोग्राफिक प्रोजेक्शन असे उपक्रम या उद्यानात राबविण्यात यावेत, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. राष्ट्रीय उद्यान प्रदूषण मुक्त करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहने आणावीत. बालोद्यान, नौकानयन, अद्ययावत शौचालयांची सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यासही त्यांनी सांगितले आहे.

SGNP
'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'मध्ये कोल्हेकुईची नोंद, पहिला छायाचित्रित पुरावा आला समोर

‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’विषयी आयोजित बैठकीला वन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी ,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्र विकास संचालक मल्लिकार्जुन ,नागपूरहून दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय. एल. पी. राव. इत्यादी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com