vidhan sabha 2019 : प्रचारासाठी शेकाप उमेदवार थेट भाजप नेत्याच्या घरी

she.jpg
she.jpg

पनवेल : उमेदवारी अर्ज मागे घेताच विधानसभा निवडणुकील लढती स्पष्ट होऊन उमेदवारांच्या प्रचाराला आता केवळ ९ दिवस उरले असताना प्रचाराचा धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे.

एकीकडे राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष मतदारसंघात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची चढाओढ उमेदवारांत लागली आहे. 188 पनवेल विधानसभा क्षेत्रात भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर आणि शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार हरीश केनी यांच्यात लढत होत असून, दोन्ही उमेदवार आपल्या प्रचाराला लागले आहेत. 

गुरुवारी हरीश केनी पनवेलमध्ये प्रचार करताना थेट माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचं घर गाठलं. आणि शेकापच्या खटारा चिन्हासमोरील बटन दाबून मला मतदान करा अशी विनंती केली. रामशेठ ठाकूर यांनीही मोठ्या मनाने केनी यांचं स्वागत करत त्यांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी हरीश केनी यांच्यासह पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे देखील उपस्थित होते.

'राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो' : रामशेठ ठाकूर

या भेटीमुळे सोशल मीडियात विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र यावर रामशेठ ठाकूर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, हरीश केनी माझ्या घरी आले त्यांचं स्वागत मी केलं. आणि शुभेच्छाही दिल्या. 'राजकारणामध्ये कोणी दीर्घकाळ शत्रू नसतो, आणि हरीश केनी हे या निवडणुकीत आमचे स्पर्धक आहेत शत्रू नाही. 'राजकारणामध्ये कोणी दीर्घकाळ शत्रू नसतो, अशी प्रतिक्रिया रामशेठ ठाकूर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com