Shambhuraj Desai : अपघात टाळण्यासाठी स्वयंमशिस्तीची गरज; शंभुराजे देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shambhuraj desai

Shambhuraj Desai : अपघात टाळण्यासाठी स्वयंमशिस्तीची गरज; शंभुराजे देसाई

मुंबई : गृहराज्यमंत्री असतांना महामार्गांवरील वाहतुक कोंडी, लेनकटींग अशा वाहतुक नियमांच्या पायमल्ली संदर्भात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरपुर अऩुभव घेतला आहे. त्यामूळे विशेष मोहिमेच्या अंतर्गत कारवाई करून शिस्त आणि समुदेशन करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्यानंतर बऱ्यापैकी सुधारणा होऊन द्रुतगती महामार्गावरील वाहतुक कोंडी घटली होती. त्यामूळे वाहतुकीच्या नियम पालकांनी आपल्या पाल्याला लहान असतांनापासूनच शिकवायला पाहिजे असल्याचे मत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी मांडले.

ते यावेळी राज्य परिवहन विभागाच्या वतीने नॅशनल सेंटर परफार्मिंग आर्ट्स सभागृहात आयोजीत राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023 या कार्यक्रमात बोलत होते. नुकतेच राज्यातील अनेक लोकप्रतीनिधींचेही अपघात झाले आहे.

याला स्वयंम शिस्तीची गरज आहे. बऱ्याचवेळा मुंबईतील बैठकी, शासकीय मिटींगसाठी धावपळ करत आपणच चालकांना वेगाने चालवण्यासाठी किंवा वेळी-अवेळी वाहन काढून प्रवास करण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी स्वतः वेळेचे बंधन घातले पाहिजे, जेणे करून असा असुरक्षीत प्रवास अपघातास कारणीभुत ठरणार नाही असेही देसाई म्हणाले.

राज्यात 1001 ब्लॅक स्पाॅट असून, त्याठिकाणी छापीव पद्धतीने रस्ता सुरक्षा अभियान राबवून चालणार नाही तर प्रत्यक्षात रस्त्यांवर उतरून जनजागृती करण्याची गरज आहे. राज्य सरकार अपघात रोखण्यासाठी अपेक्षीत त्या सर्व उपाययोजना करणार असल्याचेही देसाई यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुंबई रस्ता सुरक्षा समितीने वर्षभरात उत्तम कामगिरी बजावत 27 टक्के अपघाती मृत्युचे प्रमाण घटवले आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार अंतर्गत 18 टक्के रस्ते अपघात मृत्यु घटल्याने त्यांना संन्मानीत करण्यात आले आहे.

विद्यार्थी खोळंबले

रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित ठरले होते. त्यासाठी मुंबईतील शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सकाळीच बोलवण्यात आले होते.

मात्र, व्यस्त कार्यक्रमांमूळे सीएम,डीसीएम कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. त्यामूळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रतिनीधी म्हणून शंभुराजे देसाई यांनी कार्यक्रमाला 1.45 वाजता हजेरी लावून अर्ध्या तासात कार्यक्रम आटोपता घेतला मात्र, तोपर्यंत सामाजीक संघंटना, महाविद्यालयीन विद्यार्थी, शाळकरी मुला-मुलींना तात्कळत राहावे लागले.

आरटीओच्या ७ सेवा फेसलेस

  • वाहनांकरिता विशेष परवाना

  • वाहनांकरिता तात्पुरता परवाना

  • दुय्यम योग्यता प्रमाणपत्र

  • दुय्यम शिकाऊ अनुज्ञप्ती

  • शिकाऊ अनुज्ञप्ती वरील पत्ता बदल

  • कंडक्टर अनुज्ञप्ती वरील पत्ता बदल

  • धोकायादक माल वाहने चालविण्यास मान्यता

1 डिसेंबर पासून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेमूळे डिसेंबर 2019 च्या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये अपघात संख्येत 33 टक्के अपघात घटले आहे. तर 40 दिवसांमध्ये 20 हजार लोकांची द्रुतगती महामार्गावर वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली आहे. तर पादचाऱ्यांच्या अपघातांची संख्या वाढल्याने उजविकडून चला अभियान सुरू केले आहे. त्यामूळे 5 वर्षात 50 टक्के अपघातात घट करण्याचे उदीष्ट पुर्ण करणार आहे.

- विवेक भिमनवार, आयुक्त, परिवहन विभाग