ज्येष्ठ चित्रकार षांताराम पवार यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मुंबई - जाहिरात, दृश्‍यकला, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये भावोत्कट कविष्कारांनी सुपरिचित असणारे ज्येष्ठ चित्रकार षांताराम पवार (वय 83) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.

मुंबई - जाहिरात, दृश्‍यकला, साहित्य अशा विविध क्षेत्रांमध्ये भावोत्कट कविष्कारांनी सुपरिचित असणारे ज्येष्ठ चित्रकार षांताराम पवार (वय 83) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.

चित्रालाही शब्दांची भाषा असते, याची जाणीव करून देणाऱ्या पवार यांनी अनेक गाजलेल्या नाटकांचे नेपथ्यही केले होते. पवार यांच्या पश्‍चात तीन मुली व जावई असा परिवार आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये 1965 ते 1975 या काळात पवार यांनी अध्यापक म्हणून काम केले. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जाहिरातीत शब्द आणि चित्र यांचा अनोखा संगम असायचा. नाटकांसाठीही कलात्मक जाहिराती तयार केल्या. दामू केंकरे यांच्या काही नाटकांचे नेपथ्य त्यांनी केले होते. त्यांनी लिहिलेल्या कथासदृश पद्धतीच्या कविता पुस्तकरूपाने प्रकाशित झाल्या आहेत.

Web Title: shantaram pawar death