esakal | NPR बद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये ठरलं, महाविकास आघाडी केंद्राला...
sakal

बोलून बातमी शोधा

NPR बद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये ठरलं, महाविकास आघाडी केंद्राला...

NPR बद्दल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये ठरलं, महाविकास आघाडी केंद्राला...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीचं सरकार आहे. या सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्ष एकत्रित सरकार आहे. दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध असताना देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्यात CAA आणि NPR ला उघडपणे समर्थन दिल्यामुळे ठाकरेंच्या भूमिकेवर दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप घेतलाय. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.  

मोठी बातमी सरकार स्थापनेनंतर पहिल्यांदाच शरद पवार राज ठाकरेंबद्दल म्हणालेत...

दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या CAA  आणि NPR  ला उघडपणे समर्थन देण्याबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता याबाबत दखल घेतली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्ष बंगल्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात हायव्होल्टेज बैठक झाली. यामध्ये CAA आणि NPR या विषयांवर चर्च झाल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय. 

मागच्याच आठवड्यात शरद पवार यांनी NPR बद्दल आपली भूमिका मांडली होती. तीनही पक्ष एकत्र बसून NPR बद्दल आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. दहा वर्षानंतर होणाऱ्या जनगणनेला कुणाचाही नकार नाहीये, मात्र NPR मधील प्रश्नावलीतले रकाने काय आहेत, यातील प्रश्न काय आहेत, याबद्दल तिन्ही पक्ष एकत्रित येत चर्चा करून निर्णय घेणार आहे. याबाबत ज्या मुद्द्यांवर महाविकास आघाडीला आक्षेप असेल त्याबद्दल केंद्राला कळवण्यात येईल. या प्रकारची चर्चा आजच्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत झाल्याचं समजतंय.  

मोठी बातमी -  येत्या काळात शरद पवार दिसणार नव्या भूमिकेत, स्वतः पवार म्हणालेत...

२४ तारखेपासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे, यामध्ये वादग्रस्त त्याचसोबत अडचणीत आणणारे मुद्दे टाळावेत अशा सूचना मंत्र्यांना देण्यात आल्यात.  

sharad pawar and uddhav thackeray had meeting at varsha on caa and npr 

loading image