esakal | येत्या काळात शरद पवार दिसणार नव्या भूमिकेत, स्वतः पवार म्हणालेत...

बोलून बातमी शोधा

येत्या काळात शरद पवार दिसणार नव्या भूमिकेत, स्वतः पवार म्हणालेत...
येत्या काळात शरद पवार दिसणार नव्या भूमिकेत, स्वतः पवार म्हणालेत...
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - राजकारणातील चाणक्य म्हणून ज्यांची ओळख असे राष्ट्रवादीचे नेते, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार. वयाच्या ८० व्या वर्षी देखील शरद पवार राजकारणात सक्रियरित्या काम करतायत. राजकारणातील आणि समाजकारणातील क्षेत्रात येणाऱ्या तरुणांसाठी शरद पवार रोल मॉडेल आहेत. सातारा पोटनिवडणुकीदरम्यान शरद पवारांची पावसातील सभा सभा कुणीही विसरणार नाही. मात्र ग्राउंड झिरोवर जाऊन नागरिकांचे प्रश्न सोडवणाऱ्या शरद पवारांनी आता नवीन संकेत दिलेत. हे संकेत आहेत शरद पवारांच्या नवीन भूमिकेचे.  

मोठी बातमी - ९० रुपयात विकला जाणाऱ्या मृत्यूला आहे तिथे गाडा...

शरद पवार येत्या काळात आपल्याला नवीन भूमिकेत पाहायला मिळू शकतात. याबाबतच वक्तव्य स्वतः शरद पवार यांनी केलंय. मुंबईत पार पडलेल्या एका मराठी  वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमांत शरद पवार यांनी अत्यंत सूचक वक्तव्य केलंय. याआधी शरद पवार यांनी आपण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक लढवणार नाही असं बोलून दाखवलंय होतं. अशात आता शरद पवार यांनी आपल्याला एका नव्या भूमिकेत पाहायला मिळू शकतात.  

मोठी बातमी -  म्हणाली बाजारातून कपडे खरेदी करून येते आणि सासऱ्यांच्या शेतातील झोपडीत...

काय म्हणालेत शरद पवार ?

"तरुणांच्या कामात फार हस्तक्षेप करायचा नाही. वयाच्या या टप्प्यावर आपलं व्हिजन सांगणं योग्य नाही. आता तरुणांना व्हिजन द्यायचं आणि ते काय करतात ते बघायचं", असं शरद पवार म्हणालेत. महाराष्ट्र 60 वर्षांचा झालाय, तर मी 80 वर्षांचा झालोय. आता या वयात नवं व्हिजन काय पाहणार. मी आता हळूहळू काम थांबवतोय. मी आता तरुणांना व्हिजन देण्याचं काम करतोय. नव्या पिढीच्या हातात कारभार दिला पाहिजे, नवीन पिढी पुढे गेली पाहिजे. तरुणांनाही सल्ला मागितला तरच देणं योग्य, कारण नसताना सल्ला देणं आणि तरुणाच्या कामात हस्तक्षेप करणं योग्य नसतं. त्यामुळे तुमचा मान देखील राहत नाही असं देखील, शरद पवार म्हणालेत.

मोठी बातमी -  'शेठ' आले क्रिकेटच्या मैदानात आणि चालवल्याना चार गोळ्या...

ncp chief sharad pawar said now i will shift myself in the position of mentor of youth