

sharad pawar
esakal
मुंबई : लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याची वेळ आली असून, सर्वांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ समोर आला आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात जोरदार मोर्चा काढला. मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली. यावेळी बोलताना पवार यांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांचे जतन करण्यावर भर दिला.