पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

NCP Sharad Pawar Group Protest: पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनावर ठाण्यात काँग्रेस शरद पवार गटाने बैलगाडी आंदोलन छेडले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावरून प्रवास करत ठाणे महापालिकेपर्यंत मोर्चा काढला.
Jitendra Awhad Protest In Thane

Jitendra Awhad Protest In Thane

ESakal

Updated on

ठाणे : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ठाण्यात अनोखे आंदोलन छेडले. बैलगाड्या, टांगे आणि घोड्यावरून मोर्चा काढत पक्षाने केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली. या आंदोलनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चक्क घोड्यावरून प्रवास करत ठाणे महापालिकेपर्यंत मोर्चाचे नेतृत्व केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com