Sharad Pawar
sakal
Sharad Pawar Health: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिलीय. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्याचं कारण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. शरद पवार यांना डिहायड्रेशनचा त्रास झाला असण्याची शक्यता असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.