esakal | "खडसे - पवार" भेटीबाबत स्वतः शरद पवारांनी केला महत्त्वाचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

"खडसे - पवार" भेटीबाबत स्वतः शरद पवारांनी केला महत्त्वाचा खुलासा

एकनाथ खडसे हे शरद पवार यांना भेटणार असल्याची चर्चा आहे. या विषयावर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

"खडसे - पवार" भेटीबाबत स्वतः शरद पवारांनी केला महत्त्वाचा खुलासा

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई :भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांची भारतीय जनता पक्षाप्रतीची आपली नाराजी अनेकदा उघड केलीये. अशात एकनाथ खडसे लवकरच पक्षाला सोडचिट्ठी देणार अशा चर्चा देखील बऱ्याचदा झाल्यात.हीच चर्चा पुन्हा एकदा सुरु झालीये. लवकरच भाजपचे जुने आणि जाणते नेते, भाजप पक्ष सबळ करण्यात अग्रस्थानी असलेले एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीये. आज मुंबईत एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र या सर्व चर्चांवर स्वतः शरद पवार यांनी आपलं मत मांडलं आहे. 

महत्त्वाची बातमी : डबेवाल्यांच्या रेल्वे प्रवासाचा मार्ग मोकळा, लोकलनं प्रवास करता येणार

या आधी देखील शरद पवार यांच्यासोबत एकनाथ खडसे यांची भेट झाल्याच्या चर्चा झाल्या होत्या. २३ सप्टेंबर रोजी भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार भेटलेत असं बोललं जात होतं. मात्र त्या सर्व चर्चांवर स्वतः एकनाथ खडसे यांनी पूर्णविराम लावला होता. शरद पवारांच्या भेटीबाबतच्या विषयावर आपल्याला काहीही माहिती नाही अशी बातमी स्वतः एकनाथ खडसे यांनी दिली होती.  

महत्त्वाची बातमी : चोरी केलेल्या बाईकचा फोटो फेसबुकवर पोस्ट करणं पडलं महागात, दोघा भावांना अटक

आजही एकनाथ खडसे हे शरद पवार यांना भेटणार असल्याची चर्चा आहे. या विषयावर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खडसेंसोबतच्या भेटीची बातमी खोडून काढलीये. "मी उद्या दिल्लीला जाणार आहे. एकनाथ खडसे यांच्यासोबत भेटीचा कोणताही कार्यक्रम नियोजित नाही आणि त्यांना भेटीबाबत विनंती देखील करणार नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. एका मराठी वृत्तसमूहाशी बोलताना शरद पवारांनी एकनाथ खडसे आणि त्यांच्या भेटीबाबत स्पष्टता दिली आहे. 

sharad pawar met eknath khadase to join NCP sharad pawar denies the meeting

loading image
go to top