
कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थिताना संबोधित केलं.
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. तीन वेगवेगळ्या पक्षांचे सरकार महाराष्ट्रात स्थापित झाल्यानंतर महाराष्ट्रातील सरकार काही महिनेही टिकणार नाही असे आरोप अनेकांकडून केले गेले. मात्र आज एक वर्षानंतर सरकार भक्कम असल्याचं महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जातं. महाविकास आघाडी सरकारकडून आज मुंबईत एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. 'एक वर्ष महाराष्ट्र सेवेचे' असं या पुस्तिकेचं नाव आहे. मुंबईत पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थिताना संबोधित केलं. शरद पवारांच्या भाषणातील मुद्दे
महत्त्वाची बातमी : प्रत्येक आठवड्याला 30 लाखांची ड्रग्स विक्री, मोठा कालाचिठ्ठा झाला उघड
सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पुस्तिकेचं प्रकाशन; महाविकास आघाडी सरकारचा वर्षपूर्ती सोहळा
sharad pawar speech at mahavikas aaghadi one year compleation event speech