जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारचे पितळ उघडे करा : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 मार्च 2019

कल्याण : सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने केवळ घोषणा केली असुन समाजातील सर्व स्तरातील नागरिकांची फसवणूक केली असुन लोकसभा निवडणुकीत जनतेत जाऊन यांच्या घोषणाचा परदाफार्ष करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी केले.

कल्याण : सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने केवळ घोषणा केली असुन समाजातील सर्व स्तरातील नागरिकांची फसवणूक केली असुन लोकसभा निवडणुकीत जनतेत जाऊन यांच्या घोषणाचा परदाफार्ष करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी केले.

कल्याण लोकसभा मतदार संघातील आमदार जितेंद्र आव्हाड, ज्योती कलानी, प्रमोद हिंदुराव, बाबाजी पाटील, रमेश हनुमंते, महेश तपासे समवेत पदाधिकारी कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी संवाद साधला यावेळी जेथे काँग्रेस उमेदवार आहे तेथे त्यांना मदत करा तर जेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहे तेथे त्यांची मदत घेऊन उमेदवार विजयी करण्याचे आवाहन पवार यांनी केले. लोकसभा निवडणुकीचे महत्व सांगताना शरद पवार यांनी सांगितले की सत्तेवर येण्यापूर्वो आणि सत्तेवर आल्यावर केवळ घोषणा केल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक, इंदू मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, काळा पैसा, राफेल, शेतकरी आत्महत्या, मोठ्या प्रकल्पात अधिकारी वर्गाने खरेदी केलेल्या कवडी मोलात शेतकरी वर्गाच्या जमिनी खरेदी करून फसवणूक केल्याचा आरोप करत समृद्धी मार्ग, बुलेट ट्रेन, याचे झाले काय? स्थानिक पातळी ते देश पातळीवर समस्या दूर करण्यासाठी परिवर्तन शिवाय पर्याय नसल्याचे जन जागृती करा असे आवाहन पवार यांनी केले.

नेवाळी शेतकरी वर्गाच्या भावना माहीत असून त्यांना न्याय लोकसभा निवडणूक नंतर देण्याचा प्रयन्त करू तसेच या भागात आगरी कोळी बांधव एकत्र येऊन जनतेचा उमेदवार द्या त्याला विजयी करा समस्या दूर होतील असे आश्वासन पवार यांनी दिले.

जीएसटी आणि नोटाबंदी मुळे उल्हासनगर मधील व्यापारी त्रस्त झाला आहे यावर न्याय द्या अशी मागणी आमदार ज्योती कलानी यांनी करताच लोकसभा निवडणूक नंतर समस्या समजून नागरिकांना न्याय देण्याचा आश्वासन यावेळी पवार यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील गटबाजी दिसून येऊ नये म्हणून आज राष्टवादि काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी वर्गाने मीडियाला प्रवेश नाकारला अखेर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना फोन गेल्यावर मीडिया प्रवेश देण्यात आला तर लोकसभा निवडणूक मधील प्रश्न ऐवजी पालिका हद्दीतील प्रश्न मांडल्यावर शरद पवार यांनी सांगितले की देशात आणि राज्यात त्यांची सत्ता असल्याने पालिकेत भ्रष्टाचार आहे तो संपविण्यासाठी लोकसभा पासून परिवर्तन सुरू करा चित्र बदलेल अशी आशा व्यक्त करत बहुजन वंचीत आघाडी नेत्यांनी सर्व जागा जाहीर केल्याने मतांचे विभाजन आता रोकू शकत नाही अथवा चर्चा करण्यात अर्थ नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar statement in Kalyan