esakal | VIDEO : शरद पवारांनी सुनावलं, म्हणालेत "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही"
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO : शरद पवारांनी सुनावलं, म्हणालेत "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही"

माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही, ते इमॅच्युअर आहेत. परंतु मात्र CBI ची चौकशी कुणाला करायची असेल तर मी स्पष्टपणे सांगतो की, माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे.

VIDEO : शरद पवारांनी सुनावलं, म्हणालेत "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही"

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : काही वेळापूर्वी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांच्यात एक भेट झाली. या भेटीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये शरद पवार यांना सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत पत्रकारांनी काही प्रश्न विचारले, यावर शार पवारांनी थेट उत्तरं दिली आहेत. 

याबाबत बोलताना शरद पवार म्हणालेत की, मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे. या प्रकरणाला आपण तितकंसं महत्त्व देत नाही, हे प्रकरण माझ्यासाठी तितकं महत्त्वाचं नाही.

मोठी बातमी : वाढीव वीज बिलांबाबत आज 'मोठा' निर्णय होण्याची शक्यता, वीज बिल होणार माफ ?

शेतकऱ्यांने आत्महत्या केली तर ती बातम्यांमध्ये दाखवली जात नाही. मात्र सुशांतच्या आत्महत्येच्या बातम्या थांबत नाहीत याबद्दल मला एका शेतकऱ्याने विचारल्याचं शरद पवारांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणात कुणाला काय चौकशी करायची आहे, हा राज्य सरकार आणि CBI चा हा विषय आहे, मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. मात्र, मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. एवढं करूनही कुणाला वाटत असेल तर CBI किंवा आणखीन कोणती एजन्सी वापरायची असेल तर मी काही त्याबाबत बोलणार नाही, असं पवार म्हणालेत. 

प्रश्न : या प्रकरणात तुमचे नातू पार्थ पवार यांनी स्वतः CBI तपासणीची मागणी केली आहे, तुमचं यावर काय मत ? 

उत्तर : माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीची किंमत देत नाही, ते इमॅच्युअर आहेत. परंतु मात्र CBI ची चौकशी कुणाला करायची असेल तर मी स्पष्टपणे सांगतो की, माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर शंभर टक्के विश्वास आहे. पण कुणाला असं वाटत असेल की CBI ची चौकशी करावी, त्यांनाही काही विरोधाचं कारण नाही.  


मोठी बातमी : सुशांतच्या परिवाराने दिलेल्या अल्टिमेटमवर संजय राऊतांचं 'मोठं वक्तव्य, म्हणालेत...

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची CBI चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवारांचे सुपुत्र आणि शरद पवारांचे नातू पार्थ पवारांनी केलेली. त्याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही एक पत्र दिलं होतं. गेले काही दिवस पार्थ पवार सातत्याने पक्षविरोधात भूमिका घेत असल्याचं समोर येतंय. अशात या प्रकरणात शरद पवारांनी आता मौन सोडलंय. माझ्या नातवाच्या मागणीला कवडीचीही किंमत देत नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय.   

sharad pawars big statement on parth pawar and cbi investigation in sushant singh case