मोठी बातमी : वाढीव वीज बिलांबाबत आज 'मोठा' निर्णय होण्याची शक्यता, वीज बिल होणार माफ ?

सुमित बागुल
Wednesday, 12 August 2020

आज आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : आज आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात कोरोनामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेत. अशात वीज वितरण कंपन्यांनी वीज ग्राहकांना तीन महिन्यांच्या सरासरी बिलांमध्ये घोळ घातल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातोय. या पाश्वभूमीवर आज सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारनेही वीज बिलं कमी करण्याचा विचार केलाय आणि आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मोठी घोषणा केली जाऊ शकते.   

मोठी बातमी - वंचित बहुजन आघाडी आक्रमक, राज्य सरकारच्या विरोधात आज राज्यभर थाळीनाद आंदोलन

वीज बिल होणार माफ ?

आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यामध्ये वाढीव वीज बिलांच्या प्रस्तावावर देखील चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान घरगुती ग्राहकांना त्यांच्या सरासरीपेक्षा जास्त वीज बिल आलं असेल तर त्यावर सवलत किंवा काही टप्प्यांमध्ये वीज ग्राहकांना दिलासा दिला जाऊ शकतो का? यावर चर्चा आणि निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान घरगुती वीज ग्राहकांना वीजबिलात सूट मिळू शकते अशी माहितीही सूत्रांच्या माध्यमातून समोर येतेय. 

कालच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाढीव वीज बिलांबाबत हंडी फोडो आंदोलन केलं. नवी मुंबईतील नेरूळमध्ये महावितरण ऑफिसची तोडफोड करण्यात आलेली. नागपूर आणि पुण्यतही अशा प्रकारचं आंदोलन करण्यात आलेलं. 

मोठी बातमी - मुख्यमंत्री, तुमच्या मुलानं पदाचा दुरुपयोग केला', नीलेश राणेंचा आरोप

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक कणा मोडलाय. अशात अव्वाच्या सव्वा वीज बिलं आल्याने नाकरिकांच्या पायाखालची जमीन सरकलीये. वाढीव वीज बिलाचे पैसे भरायचे कसे, हा सर्वसामान्य नागरिकांसमोर प्रश्न उभा टाकलाय. नागपूरमध्ये याच कारणामुळे एकाने आत्महत्या देखील केलीये. 

good news regarding access electricity bill may come after cabinet meeting

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news regarding access electricity bill may come after cabinet meeting