सुशांतच्या परिवाराने दिलेल्या अल्टिमेटमवर संजय राऊतांचं 'मोठं वक्तव्य, म्हणालेत...

सुमित बागुल
Wednesday, 12 August 2020

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी विविध प्रश्नावर आपलं रोकठोक मत मांडलं.

मुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांनी आजच्या सामानातून नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून ‘ऑपरेशन कमळ’चा संजय राऊत यांनी त्यांच्या स्टाईलने समाचार घेतला. ‘सामना’तून राणेंना भोंदू डॉक्टरांची उपमा देण्यात आली आहे. यानंतर आज संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी विविध प्रश्नावर आपलं रोकठोक मत मांडलं. यामध्ये राजस्थानातील राजकारण, महाराष्य्रतील महाविकास आघाडी सरकार, सरकार बद्दल उठवल्या जाणाऱ्या वावड्या, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील बैठकांमध्ये मांडले गेलेलं मुद्दे, आदित्य ठाकरे यांचं सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गोवलं जाणारं नाव, सुशांत सिंह राजपूत प्रकरण, सुशांत प्रकरण आणि सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबाने केलेली मागणी या आणि अशा अनेक विषयांवर भाष्य केलं.

मोठी बातमी : वाढीव वीज बिलांबाबत आज 'मोठा' निर्णय होण्याची शक्यता, वीज बिल होणार माफ ?

काय म्हणालेत संजय राऊत : 

 • महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे, अश्या प्रकारचे प्रगोग झाले आणि तर फसले, हा इतिहास आहे
 • राज्यस्थानचं प्रकरण राज्यस्थानात, इथे मुसळधार पाऊस आहे, सगळं वाहून गेलं,  त्यांना प्रयत्न करत राहूदे
 • ऑक्टोबरपर्यंत सरकार राहणार नाही असं म्हणणाऱ्यांना आत्मनंदन म्हणतात
 • इथे खूप प्रश्न आहेत, त्यासाठी मुख्यमंत्री पवार साहेब, सर्व मंत्री प्रयत्न करतायत
 • कोणाला सरकार पडणं, अस्थिर करणं, यात रस असेल त्यांनी हे जनतेच्या दुःखावर पोळ्या शेकण्याचं काम करत राहावं, आम्हाला यामध्ये इंट्रेस्ट नाही
 • हे महाराज्यांचं राज्य आहे, इथे जनतेचं हित याला मोठं प्राधान्य दिलं जाईल 

मोठी बातमी - मुंबई पालिका आयुक्तांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घेतला 'हा' निर्णय

 • प्रधानमंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या हिताचे मुद्दे मांडतात
 • सुशांत सिंग राजपूतबद्दल मला त्यांची मागणी ठाऊक नाही, मला त्याबद्दल काहीही ठाऊक नाही, मुंबईत खूप काम आहे
 • मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या मागणीबद्दलही ठाऊक नाही
 • केंद्रासंदर्भातही काही विषय आहेत, राजकारण न करता देशाने पुढे जावं, ही आमची स्पष्ट भूमिका आहे
 • सरकार अजिबात अस्थिर नाही आणि अशा प्रकरणांवर जर सरकार अस्थिर होणार असेल तर केंद्राचं सरकार आधी अस्थिर होईल
 • मुंबई पोलिस सक्षम आहेत आणि मुंबई पोलिसच काम करतील, 
 • मुंबई पोलिसांना अस्वस्थ करून, त्यांच्यावर दबाव आणण्याची कोणला दुर्बुद्धी झाली असेल, तर ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो

मोठी बातमी -  मुख्यमंत्री, तुमच्या मुलानं पदाचा दुरुपयोग केला', नीलेश राणेंचा आरोप

 • सुशांतच्या परिवाराची मागणी मला ठाऊक नाही, जर आमच्याकडून काही चूक झाली आहे, असं असेल तर आम्ही नक्कीच यावर विचार करू
 • नोटीसीवर आम्ही आणि त्यांचे परिवार काय ते बघू
 • after targeting rane in samana sushant singh rajput spoke to media about sushant singh rajputs family vs sanjay rauts conflit, raut said if there is mistake from i shall think of apologizing 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajputs family vs sanjay raut said if there is mistake will think of apologizing