राज ठाकरे यांच्याबाबत शरद पवारांनी केले भाष्य; म्हणाले तरुणाईत 'क्रेझ' कायम

राज ठाकरे यांच्याबाबत शरद पवारांनी केले भाष्य; म्हणाले तरुणाईत 'क्रेझ' कायम

मुंबई - राज्यात नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकांमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच निवडणूक असल्याने, मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडी नेत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे  (raj thackeray)यांच्याबद्दल मत मांडले आहे.

या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी अनेक राजकीय प्रश्नांवर आपले मत मांडले आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या राजकीय वाटचाली बाबतही त्यांनी आपले मत मांडले आहे.  पवार यांना राज ठाकरेंबाबत लोकांमध्ये असलेल्या क्रेझ बाबत विचारले तेव्हा ते म्हटले की, 'राज ठाकरे यांचा वेगळा पक्ष आहे. ते नेहमी आपली मतं स्पष्टपणे मांडत असतात. त्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. त्यांना निवडणूकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी, तरी याचा अर्थ असा नाही त्यांची तरुणांमधली क्रेझ संपली आहे. राज यांची क्रेझ तरुणांमध्ये कायम आहे'.

शरद पवार यांचा 12 डिसेंबरला वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने त्यांची ही मुलाखत घेण्यात आली होती. त्यात त्यांनी अनेक राजकीय विषय़ांवर भाष्य़ केले. त्यांना राहुल गांधी यांच्या राजकीय परफॉमन्सवर विचारले असता त्यांनी, राहुल गांधी यांच्या कामात सातत्य नसल्याचे म्हटले होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com