
बंडखोर आमदार, राज्यपालांना शरद पवारांचा टोला; म्हणाले...
मुंबई : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी बंडखोर आमदार आणि राज्यपालांना त्यांच्या कृतीवरुन टोला लगावला आहे. केंद्रानं महाराष्ट्र कुस्तगीर परिषद बरखास्त केल्याप्रकरणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे भाष्य केलं. (Sharad Pawars taunt to Rebel MLAs and Governor over swear in ceremoney)
हेही वाचा: राजकीय पक्षांना कोर्टाचं समर्थन हवं असतं - सरन्यायाधीश
पवार म्हणाले, सभागृहात गेल्यानंतर हे सगळे विचारवंत काय करणार आहेत, यावर सर्व अवलंबून आहे. मी असं ऐकलं आहे की, जे गेले ते परत आल्यानंतर सभागृहात बसल्यानंतर त्यांचं मतपरिवर्तन झाल्याचा निर्णय तुम्हाला पहायला मिळेल, असा विश्वास काही लोकांना आहे.
कुठल्याच राज्यपालांनी मला पेढा भरवला नाही - पवार
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीवेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पेढा भरवला होता. यावरुन शरद पवार यांनी त्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले, मी जवळपास ९० सालापर्यंत विविध पदावरुन शपथा घेतल्या आहेत. पण कुठल्या राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही. एकतर व्यासपीठावर राज्यपालांनी शपथ घेताना जे काही चुकीचं आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तसंच यापूर्वी मी ज्यांनी शपथ घेतली त्यांना पेढा भरवल्याचं किंवा पुष्पगुच्छ दिल्याचं पाहिलं नाही. त्यामुळं आनंद आहे की, त्यांनी आपल्या एकदंरीत कार्यपद्धतीत गुणात्मक बदल केले आहेत.
Web Title: Sharad Pawars Taunt To Rebel Mlas And Governor Over Swear In Ceremoney
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..