
मुंबई : शेअर रिक्षाची मनमानी पध्दतीने दरवाढ करून कांजुरमार्ग पूर्वेला रिक्षाचालकांच्या मनमानीचा स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. कांजुरमार्ग पूर्व ते कामगार आघाडी या अंतरासाठी १० रुपये शेअर रिक्षाचा दर अचानकपणे वाढवत १५ रुपये केल्याने प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी प्रादेशिक परिवहन अधिका-यांकडे स्थानिक नागरिकांनी केली आहे.