शार्कचे आठ टन कल्ले जप्त; तस्करीप्रकरणी चौघांना अटक

मुंबई - "डीआरआय''ने सोमवारी जप्त केलेले शार्क माशांचे कल्ले.
मुंबई - "डीआरआय''ने सोमवारी जप्त केलेले शार्क माशांचे कल्ले.

मुंबई - शार्क माशांच्या कल्ल्यांची तस्करी केल्याप्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) चौघांना अटक केली आहे. शिवडी व गुजरातमध्ये छापे टाकून आठ टन कल्ले जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी आजवर 20 हजार शार्क बेकायदा पकडून त्यांचे कल्ले चीन व हॉंगकॉंगला पाठवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

सरफराज अली (39), हमीद अली (32), अहमद आशिक (34) व आर शिवारामन (28) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यातील सरफराज हा मुख्य आरोपी असून, हमीद त्याचा भाऊ आहे. दोघेही शार्कचे कल्ले सुरक्षा यंत्रणांचा डोळा चुकवून चीन व हॉंगकॉंगला पाठवायचे. या कल्ल्यांपासून तयार करण्यात येणारे सूप 100 डॉलर (सात हजार रुपये) दराने विकले जाते. आरोपी समुद्रातून जिवंत शार्क पकडून त्यांचे कल्ले कापायचे व माशाला समुद्रात सोडून द्यायचे. अशा माशांचा पुढे मृत्यू होत होता. माशाच्या इतर अवयवांपेक्षा पाठीवरील कल्ल्याला अधिक किंमत मिळते. हा भाग शार्कच्या वजनाच्या केवळ पाच टक्के वजनाचा असतो. शार्कच्या शिकारीला बंदी आहे.

किंमत 40 कोटी
शार्कचे जप्त केलेले कल्ले मुंबई, वसई, उत्तन व गुजरातमधून आणल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले आहे. या संपूर्ण मालाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 35 ते 40 कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com