Uddhav Thackeray : भीती वाटणारी सत्ता उलथवलीच पाहिजे; पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंचं पाचोऱ्यातील पदाधिकाऱ्यांना आवाहन

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा आज शिवसेनेच्या ठाकरे गटात पक्षप्रवेश झाला, यावेळी उद्दव ठाकरे बोलत होते.
Shinde Faction and BJP office bearers from Pachora assembly constituency joined Uddhav Thackeray Faction
Shinde Faction and BJP office bearers from Pachora assembly constituency joined Uddhav Thackeray Faction
Updated on

आगामी वर्षात निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. यासाठी राजकीय पक्षांकडून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यादरम्यान अनेक पक्षात इन्कमिंग देखील सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आज पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना संबोधीत केलं.

ते म्हणाले की, सत्तेला घाबरणार असला तर काही उपयोगाचे नाही. ज्या सत्तेची भीती वाटते ती बदलल्याशिवाय पर्याय नाही. ती सत्ता बदललीच पाहिजे. त्याच जिद्दीने मी उभा आहे. सत्ता सामान्यांना आपली वाटली पाहिजे. त्याची भीती वाटत असेल तर ती सत्ता उलथवलीच पाहीजे आणि त्यासाठीच आपण काम करतोय असे उद्दव ठाकरे म्हणाले.

Shinde Faction and BJP office bearers from Pachora assembly constituency joined Uddhav Thackeray Faction
Nagpur Accident : दुर्दैवी ! सायकलवरून जाणाऱ्या बहिण-भावाचा टिप्परच्या धडकेत मृत्यू! संतप्त जमावाने पेटवला ट्रक

शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रयत्नाने आज ठाकरे गटात हे पक्षप्रवेश पार पडले. यामध्ये पाचोरा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, सभापती, माजी सरपंच इत्यादींचा समावेश होता. दिवंगत आमदार आर ओ पाटील यांच्या वैशाली सूर्यवंशी कन्या आहेत.

वैशाली पाटील आणि शिवसेना शिंदे गटात असलेले त्यांचे भाऊ त्या ठिकाणचे स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्यात मागील काही दिवसांपासून मोठा राजकीय वाद पाहिला मिळत आहे. यादरम्यान आज शिंदे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पार पडले.

Shinde Faction and BJP office bearers from Pachora assembly constituency joined Uddhav Thackeray Faction
Maharashtra Politics : शिंदे गट भाजपमध्ये १०० टक्के विलीन होणार; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com