Shinde Group Demands 2.5-Year Mayor Term
esakal
मुंबई
शिंदे गटाकडून अडीच वर्ष महापौर पदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर; बावनकुळेंचं लक्षवेधी वक्तव्य, म्हणाले...
Shinde Group Demands 2.5-Year Mayor Term : चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना शिंदे गटाच्या मागणीच्या चर्चांबाबत विचारण्यात आलं. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई महापालिकेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीत भाजपने 89 तर शिंदेंच्या शिवसेनेनं 29 जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर आता महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आपल्याला अडीच वर्षे महापौरपद मिळाव, अशी मागमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं केली असल्याचं समजतं आहे. याचर्चांवर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
