

Shinde Shivsena Leader Join BJP
ESakal
डोंबिवली : कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाच्या संघटनाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका शीतल मंढारी, सहसंपर्कप्रमुख विजय जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे शिंदे गटाची पूर्वेकडील पकड ढासळल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.