

Vikas Mhatre
ESakal
डोंबिवली : ठाकरे बंधू यांनी मतदार यादीतील घोळा वरून आवाज उठवला असताना आता भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाकडून देखील याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. डोंबिवली पश्चिमेतील राजू नगर आणि गरीबाचा वाडा येथील सुमारे साडेचार हजार मतं दुसऱ्या पॅनलमध्ये टाकण्यात आल्याचा आरोप भाजपातून शिंदे गटात प्रवेश केलेले विकास म्हात्रे यांनी केला आहे. “मतदार यादीतील घोळाकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, तर त्यापाठी असलेल्या अदृश्य शक्ती बाहेर काढाव्या लागतील,” असा कठोर इशारा म्हात्रे यांनी दिला.