
ठाणे : सर्वच सण- उत्सव राजकीय पक्षांनी आणि पुढार्यांनी हायजॅक केले असताना आता विवाहित महिलांची भावनिक गुंफण असलेली वटपौर्णिमाही त्यातून सुटली नसल्याचे ठाण्यात पहायला मिळाले आहे. येथील बी. केबीन परिसरात असलेल्या वडाच्या झाडाला शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकार्यांनी आपला बॅनर लावल्याचा अजब प्रकार घडला आहे.