Eknath Shinde
Eknath Shindeesakal

शिंदेंच्या योजनांना ब्रेक पे ब्रेक! आनंदाचा शिधानंतर माझी शाळा, सुंदर शाळा योजना बंद होण्याच्या मार्गावर

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजनांना आता एका पाठोपाठ एक ब्रेक लागत असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. आनंदाचा शिधानंतर माझी शाळा सुंदर शाळा बंद होण्याची शक्यता आहे.
Published on

Maharashtra Politics: मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या योजनांना आता ब्रेक लावण्यात येत आहे. 'आनंदाचा शिधा' ही योजना जवळपास बंद करण्यात आलीय. त्यातच आणखी एका योजनेला थांबवण्याचा निर्णय़ घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. माझी शाळा, सुंदर शाळा या योजनेला एकच वर्ष झालंय. वर्षभरातच ही योजना बंद करण्यात येत असल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com