अमोल कोल्हेंच्या 'राज' भेटीने चर्चांना उधाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

शिरूरमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. शिवसेनेचे आढळराव पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या काँग्रेसने अमोर कोल्हे यांस उमेदवारी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये थेट लढत झाली.

मुंबई : अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज (बुधवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगत आहे. त्यानंतर आता अमोल कोल्हे यांनी घेतलेल्या राज ठाकरेंच्या भेटीनंतर या चर्चांना आणखीनच बळ मिळाल्याचं बोललं जात आहे. पण ही सदिच्छा भेट असल्याचं अमोल कोल्हे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीचे चित्र पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे महाआघाडीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. कोल्हे यांच्या 'राज' भेटीमुळे या चर्चांना आणखी उधाण आले आहे.

शिरूरमध्ये यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. शिवसेनेचे आढळराव पाटील यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या काँग्रेसने अमोर कोल्हे यांस उमेदवारी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये थेट लढत झाली. अमोल कोल्हे यांची राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर एका प्रश्नाला उत्तर देताना आढळराव पाटील यांनी थेट अमोल कोल्हेंच्या जातीचा उल्लेख केला होता. कोल्हे यांच्यासोबत मराठा आणि माळी या दोघांची संख्या लक्षणीय आहे. लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरण गाजली असताना येत्या विधानसभा निवडणुकीत याबाबत काय चित्र पहायला मिळत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shirur MP Amol Kolhe Meets MNS chief Raj Thackeray