esakal | शिवसेना भाजपातील 'हे' आहेत हल्ले आणि प्रतिहल्ले
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना भाजपातील 'हे' आहेत हल्ले आणि प्रतिहल्ले

शिवसेना भाजपातील 'हे' आहेत हल्ले आणि प्रतिहल्ले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात आज मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. यात आज सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आणि भाजपची बाजू मांडली. त्यानंतर लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीस यांच्या हल्ल्यावर प्रतिहल्ला चढवला. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर टिप्पणी केली. नक्की काय आहेत दावे आणि प्रतिदावे.   

भाजप : गेल्या पाच वर्षात आमच्या सोबत असलेला (तुम्हाला वाटला कि नाही माहिती नाही ) मित्रपक्ष आणि त्यांचे नेते या सर्वांचे मी आभार मानतो. 

शिवसेना :  काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहून काळजी वाटली. त्यांनी केलेल्या अचाट कामांचा आढावा घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. त्यांनी केलेल्या अचाट कामं आम्ही नसतो तर ते करू शकले असते का ?

भाजप : माझ्यासमोर कधीही अडीच वर्षांच्या विषयावर निर्णय झालेला नव्हता.. एकदा अडीच वर्षांच्या चर्चेवर बोलणी होऊन फिस्कटली होती.. दिवाळी वेळी झालेली चर्चा अनौपचारिक चर्चा होती 

शिवसेना : या आधीदेखील आमची अडीच-अडीच वर्ष सत्ता स्थापन करण्यावर चर्चा सुरु होती. उपमुख्यमंत्रिपद घेण्याएवढे आम्ही सत्तेसाठी लाचार नाही.  मी शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिलं आहे. ते मी पाळणारच. अमित शहांचा मला फोन आला, त्यांनी विचारलं क्या चाहते हो, ते हे देखील म्हणालेत ज्याच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री. यावर मी नाही म्हणालो म्हटलो. आम्ही सेनाप्रमुखांच्या खोलीत बसून चर्चा करत होतो. माझ्यामुळे युतीतील 'रिश्ता' खराब झालाय, तो माझ्या कार्यकाळात नीट करू असंदेखील अमित शाह म्हणाले असल्याच उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं. 'पद आणि जबाबदारी यांचं समसमान वाटप हे ठरलं होतं' माझं मराठी कच्च नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील A टू Z मुद्दे

भाजप : भाजपच्या वतीने कधीही बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचा अपमान झालेला नाही. गेल्या पाच वर्षात आणि गेल्या १० दिवसात शिवसेनेकडून आमचे नेते मोदी यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली गेली.  विरोधात असताना टीका केली जाते मात्र, ही टीका आम्हाला मान्य नाही. आमच्या धोरणांवर  बोलण्याव्यतिरिक्त आमच्या नेत्याबद्दल वारंवार वक्तव्य केली जातायत. 

शिवसेना : आम्ही मोदींवर टीका केलेली नाही. मात्र, मोदींचं मला 'लहान भाऊ' बोलणं कुणाच्यातरी पोटात दुखलं असेल. उद्यान राजेंच्या मोदी विरोधी वक्तव्यांवर भाजपने कधी नाराजी व्यक्त केली नाही.   

भाजप : मी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन केले ते त्यांनी घेतलेले नाही, आमच्याकडून चर्चेची दारं खुली होती. आमच्याशी चर्चा न करता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी शिवसेना चर्चा करतंय 

"खोटा रिश्ता ठेवायचा नाही" उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील A टू Z मुद्दे 

शिवसेना :  मला खोटं ठरवणाऱ्या लोकांशी मी बोलणार नाही. शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत बोलतेय असं ते म्हणतायत. पण मी चोरून मारून बोलत नाहीये उजळ माथ्यानी बोलतोय. 

भाजप  : भाजप सरकार येत्या काळात सरकार स्थापन करेल, हा मी विश्वास देतो. आभार मानत असताना जनतेला लवकर सरकार देऊ शकलो नाही याची खंत वाटते  

शिवसेना : 'ते' जर सरकार स्थापन करणार असल्याचं सांगत असतील तर त्यांनी तसं करावं. त्यानंतर आम्ही आमचे पर्याय खुले करू 

Webtitle : shisvena BJP government formation conflict details