आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड करणारे शिवसैनक पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sainik arrested for vandalized MLA Mangesh Kudalkar office mumbai

आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड करणारे शिवसैनक पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात असलेल्या आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या शाखाप्रमुख दिलीप मोरे सह १९ शिवसैनिकांना मुंबईतील नेहरू नगर पोलिसांनी सीआरपीसी कलम ६८ अंतर्गत ताब्यात घेतले आहे. मुंबईतील कुर्ला परिसरातील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनीही गुवाहाटीत पोहोचत एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी झाले. एकनाथ शिंदे यांच्या गटात कुडाळकर गेल्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले .

आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी थेट मंगेश कुडाळकर यांच्या कुर्ला येथील कार्यालयावर हल्ला चढवला . आक्रमक शिवसैनिकांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेत मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या बॅनर्सची तोडफोड केली आहे. या तोडफोडीचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. मुंबईत घडलेल्या घटनेनंतर पोलिसा एक्शन मोड मध्ये आहे पोलीस आयुक्त यांनी मुंबई शहरातील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय, मंत्री, खासदार, आमदार यांचे कार्यालय, निवासस्थान शाखा या ठिकाणी बंदोबस्त लावण्याबाबत सुचना दिल्या आहेत.

Web Title: Shiv Sainik Arrested For Vandalized Mla Mangesh Kudalkar Office Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..