तुमची मेट्रो तर... आमचा कोस्टल रोड! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

मुंबई : मेट्रो आणि कोस्टल रोड या प्रकल्पांवरून शिवसेना-भाजपमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. 28) महापालिका अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.

दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोस्टल रोडचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासोबत शनिवारी (ता. 26) गिरगाव चौपाटीला भेट देणार आहेत. 

मेट्रो रेल्वेच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले असून सध्या भू-तांत्रिक सर्वेक्षण सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होईल. त्यासाठी पालिकेच्या विविध परवानग्यांची गरज आहे. त्या फेब्रुवारीत होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडू नयेत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर कामाला लावले आहे. या कामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांसह पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी मेट्रोचा किमान एक तरी खांब उभा राहावा, यासाठी मुख्यमंत्र्यांची घाई सुरू आहे. 

मुख्यमंत्र्यांची मेट्रो सुसाट निघाली असतानाच शिवसेनाही मागे राहिलेली नाही. नरिमन पॉईंट ते कांदिवलीपर्यंतच्या कोस्टल रोडसाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. कोस्टल रोडचे काम महापालिका निवडणुकीपूर्वी सुरू व्हावे, यासाठी शिवसेना आग्रही आहे. या प्रकल्पाच्या नरिमन पॉईंट ते वांद्य्रापर्यंतच्या पहिल्या टप्प्याचे भू-तांत्रिक सर्वेक्षण सुरू आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी किमान या कामाचे भूमिपूजन उरकून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे शनिवारी सकाळी गिरगाव चौपाटीच्या परिसराची पाहाणी करणार आहेत.

Web Title: Shiv Sena-BJP in race to announce development projects for Mumbai