
भगवी शाल द्याल असं वाटलं,पण त्याची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
मुंबई : भगवी शाल द्याल असं वाटलं मात्र त्याची गरज नाही. भरपूर बोलायचं आहे त्यामुळे जे काही बोलायचं ते 14 तारखेला बोलणारच असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेश मार्गावरील महाराजांच्या पुतळ्यामागे किल्ले शिवनेरीची कायमस्वरूपी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृतीचे उद्घाटना प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.
महाराष्ट्र दिनी आपले स्वप्न साकारले जाते. याचा मला अभिमान आहे. यापूर्वी महाराष्ट्र दिनी येथे येतांना फक्त डेकोरेशन केले जात होते.मात्र महाराज म्हटल्यानंतर वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. महाराजांच्या वैभवांच दर्शन घडल पाहिजे, त्यामुळे मात्र, अनिल परब आणि विधाते यांच्या प्रयत्नातून महाराजांच्या शिवनेरीच्या प्रतिकृतीचे स्वप्न पूर्ण झाले. ज्यामध्ये उंची आणि सर्व नियम अटी शर्थीचे पालन केले आहे. असेही ठाकरे म्हणाले.
राकट देशा म्हटल्यानंतर तो राकट पणा दिसला पाहिजे, तो दिसतोय यामध्ये, शिवरायांचे दर्शन मुंबईकरांना येता-जाता दिसणार आहे. पण आपण कुठे आलो आहे. परदेशातून येणाऱ्यांना सुद्धा शहराची ओळख कळणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि परिसरास भव्य-दिव्य साज चढल्याने आता मुंबई विमानतळावर प्रवेश करताना आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरून जाताना या भव्य-दिव्य प्रतिकृतीचे दर्शन मुंबईकरांनाही करता येणार आहे.
Web Title: Shiv Sena Cm Uddhav Thackeray Criticize Mns Raj Thackeray Says I Dont Need Saffron Shawl Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..