

Ramesh Mhatre
ESakal
डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कथित मारहाण प्रकरणातील आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक झाल्यानंतर काही तासांतच उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना गुरुवारी प्रत्यक्ष कल्याण न्यायालयात हजर केले जाणार की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार, याकडे लक्ष लागले आहे.