उल्हासनगरचा डीपी रद्द करण्सासाठी शिवसेना नगरसेवकाचे आमरण उपोषण

दिनेश गोगी
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

उल्हासनगर : रस्ता रुंदीकरणात दोनदा घरे गेल्यावर नागरिकांनी उर्वरित जागेत त्यांचा पुन्हा संसार थाटला. मात्र नव्या विकास आराखड्यात अर्थात डीपीत पुन्हा या रस्त्याचे 80 फुटाने रुंदीकरण करून तिसऱ्यांदा नागरिकांचा संसार उध्वस्त केला जात असून हा डीपीच रद्द करा. या मागणीसाठी शिवसेना नगरसेवक सुमित सोनकांबळे यांनी लालचक्की चौकातील पाण्याच्या टाकीजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे.
 
महाराष्ट्र शासनाने अयोग्य विनाशकारी विकास आराखडा संपूर्ण उल्हासनगरकरांच्या माथी मारला आहे. या पूर्वी सुद्धा या विनाशकारी विकास आराखड्याच्या विरोधात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ.बालाजी किणीकर, धनंजय बोडारे, रमेश चव्हाण सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आणि हजारो नागरिकांच्या साक्षीने मोर्चा काढण्यात आला होता. संपूर्ण शहराचा विरोध असतानाही हा डीपी मंजूर झाला असून त्यानुसार रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यात छत्रपती शाहू महाराज उड्डाण पूल ते वृंदावन सोसायटी हा रस्ता 80 फुट करण्यात येणार आहे. या रस्त्यावर सुवर्ण संकेत सोसायटी व न्यू शिवम सोसायटी या दोन इमारती असून त्या 25-30 बांधण्यात आलेल्या आहेत.

आजूबाजूला राहणारे नागरिक सुद्धा कित्तेक वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत. या आधी दोनदा या रस्त्याचे रुंदीकरण केल्याने त्यांनी त्यांची जागा गमावली होती. उर्वरित जागेत त्यांनी संसार उभा केला. आता 80 फुटाच्या रुंदीकरणात पुन्हा तिसऱ्यांदा नागरिकांचा संसार उध्वस्त केला जाणार असून त्यांचा संसार शाबूत ठेवण्यासाठी डीपीच रद्द करा या मागणी करिता लोकशाही मार्गाने आमरण उपोषणचा पवित्रा हाती घेतल्याची माहिती शिवसेना नगरसेवक सुमित सोनकांबळे यांनी दिली.

Web Title: Shiv Sena corporator's fasting till death to cancel DP of Ulhasnagar