स्थानिक स्वराज्य निवडणुका लढण्याबाबत शिवसेनेनं घेतला मोठा निर्णय

स्थानिक स्वराज्य निवडणुका लढण्याबाबत शिवसेनेनं घेतला मोठा निर्णय

मुंबई: कोविडमुळे रखडलेल्या नवी मुंबई महानगर पालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी वर्षा निवासस्थानी शिवसेना मंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली. तसंच बैठकीत नेत्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकत्र लढण्याचा विचार पुढे आला आहे. त्याबाबत या बैठकीतही चर्चा करण्यात आली असल्याचे समजते. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली. नवी मुंबईसह राज्यातील काही महत्वाच्या शहरांच्या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने शिवसेनेने आतापासून तयारी सुरु केली आहे.

आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीतीवर खलबतं सुरू असून याबाबत अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

या बैठकीत निवडणुकांबाबत चर्चा करण्याबरोबरच मंत्र्यांच्या विभागातील कामाचाही आढावा घेण्यात आला असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री, पदाधिकारी उपस्थित होते. 

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

shiv sena decision local body election cm uddhav thackeray meeting mahavikas aghadi

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com