'शिवमहाआघाडी'च ठरलं!; सत्तास्थापनेचा असा असेल फॉर्म्युला?

टीम ई-सकाळ
Monday, 11 November 2019

आज (सोमवार) सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यानंतर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत हेही दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे महाशिवआघाडीचे सरकार येणार हे निश्चित आहे. 

मुंबई : भाजपने संख्याबळाच्या अभावी सत्ता स्थापनेला नकार दिल्यामुळे आता राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असेलल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. निवडणुकीत भाजपला 105 तर, शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाच्या 56 जागा मिळाल्या होत्या. आता शिवसेना सरकार स्थापन करणार हे निश्चित असून, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मदत घेणार आहेत. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

बहुमताचा आकडा मिळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, राज्यात महाशिवआघाडी उदयास येणार हे स्पष्ट आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद असेल. तर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना गृहमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.  

भाजपचे चाणक्य महाराष्ट्रात फेल 

आज (सोमवार) सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यानंतर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत हेही दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे महाशिवआघाडीचे सरकार येणार हे निश्चित आहे. 

काय घडले कसे घडले?
शिवसेना-भाजप युतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून फूट पडली. भाजपने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप शिवसेनेने केला. तर, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची चर्चा झाली नसल्याचं दावा भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले आणि संवादच संपुष्टात आला. त्यामुळं भाजपला आज, संख्याबळा अभावी सत्ता स्थापन करू शकणार नसल्याचं राज्यपालांना सांगावं लागलं. काल राज्यपालांनी सर्वांत मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी  निमंत्रण दिलं होतं. पण, आज भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेसाठी असमर्थ असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर अवघ्या तासाभरात राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. 

शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता; काँग्रेसला 'या' पदाची अपेक्षा

सत्ता स्थापनेचा फॉर्म्युलाही ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेत थेट सहभागी होणार आहे. तर, काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विराजमान होतील असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena got invitation to form government in maharashtra congress ncp