esakal | 14 गावांत शिवसेना लढविणार निवडणूक, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेंची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

14 गावांत शिवसेना लढविणार निवडणूक, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेंची माहिती

कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सेना निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

14 गावांत शिवसेना लढविणार निवडणूक, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगेंची माहिती

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

मुंबईः  ठाणे ग्रामपंचायत निवडणुकीवर 14 गावांतील सर्व पक्षीय विकास समितीने बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असतानाच शिवसेनेने मात्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सेना निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान शिवसेना हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असल्याने आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेमधून शिळफाटा परिसरातील 14 गावे वगळण्यात आली आहेत. गावे वगळण्यात आल्यानंतर कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील या गावांत ग्रामपंचायत अस्तित्वात आली. मात्र गावातील विकासकामे रखडल्याने गावांचा पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समावेश केला जावा अशी मागणी 2015 पासून येथील ग्रामस्थांनी लावून धरली आहे. सरकारकडे वारंवार मागणी करुनही ही मागणी मान्य न झाल्याने ग्रामस्थांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा- मुंबईत तब्बल 206 अनधिकृत शाळा, मान्यता न घेताच विद्यार्थ्यांना शिक्षण

एप्रिल 2020 मध्ये 14 गावांच्या वाकळण, नागाव, दहिसर, पिंपरी आणि नारिवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही जाहीर झाल्या होत्या. या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मार्च महिन्यात सर्व पक्षीय विकास समितीने घेतला होता. कोरोना संक्रमणामुळे या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. डिसेंबर महिन्यात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर मंगळवारी बैठक घेत निवडणुकांवर बहिष्कार घातल्याचा निर्णय जाहीर केला. या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. त्यांनीही निवडणूक बहिष्काराला पाठिंबा दर्शविला होता, असे असले तरी काही शिवसैनिकांनी मात्र निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा दोन दिवस रंगली होती. बुधवारीही इच्छुक गटाची बैठक पार पडली या बैठकीत काय निर्णय झाला याविषयी इच्छुकांनी अद्याप मौन पाळले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

14 गाव सर्वपक्षीय समितीने तिसऱ्यांदा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे ठरविले असले तरी शिवसेना मात्र ही निवडणूक लढविणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुखांनी सांगितले. शिवसेनेच्या या निर्णयामुळे आता सर्व पक्षीय विकास समिती आणि मनसे काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

बहिष्कार का करायचा तर गावांना न्याय मिळाला पाहिजे, मात्र त्याबाबतीत कोणतीही पुढील कारवाई कोणी केली नाही. बहिष्कार घालण्याचा निर्णय काहींनी घेतला असला यावेळेस शिवसेनेची भूमिका मात्र निवडणूक लढविण्याची आहे.
गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख शिवसेना

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Shiv Sena Gram Panchayat elections 14 villages district chief Gopal Landage said

loading image