esakal | पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा शिवसेनेकडे |Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

ShivSena

पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा शिवसेनेकडे

sakal_logo
By
नविद शेख

मनोर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. सावरे-एम्बुर गटात शिवसेनेच्या विनया पाटील आणि नंदोरे देवखोप गटातून शिवसेनेच्या नीता पाटील विजयी झाल्या आहेत. बुधवारी (ता.06) सकाळी दहा वाजता पालघरच्या तहसीलदार कार्यालया लगतच्या सभागृहात मतमोजणीला सावरे एम्बुर जिल्हा परिषद गटापासून सुरुवात करण्यात आली होती.

सावरे एम्बुर गटात झालेल्या तिरंगी लढतीत शिवसेनेच्या विनया पाटील यांनी एकहाती विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या सुरुवाती पासून शिवसेनेच्या विनया पाटील यांनी मोठी आघाडी घेत बहुजन विकास आघाडीच्या उमेदवार ऍड प्रांजल पाटील यांचा 3 हजार 635 मतांनी पराभव केला आहे. भाजपच्या सुवर्णा सांबरे यांनी 2577 मते मिळवून तिसरे स्थान पटकावले आहे. पहिल्या विजयाची घोषणा करताना मतमोजणी केंद्राबाहेर शिवसैनिकांनी मोठा जल्लोष सुरू केला होता.

हेही वाचा: Live : वाशिममध्ये अटीतटीची लढत, कोण मारणार बाजी?

दीड वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीमधील सरळ लढतीत शिवसेनेच्या विनया पाटील यांनी बहुजन विकास आघाडीच्या मनीषा ठाकूर यांचा 979 मतांनी पराभव केला होता. पोटनिवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांनी वेगळी चूल मांडल्याने राजकिय चित्र पालटण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु शिवसेनेने सावरे एम्बुर जिल्हा परिषद गट कायम राखला आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी जोर लावला होता.

नंडोरे-देवखोप गटात शिवसेनेच्या नीता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कविता खटाळी यांचा 867 मतांनी पराभव केला आहे. नीता पाटील यांना 4072 मते मिळाली आहेत. दीड वर्षांपूर्वी नंदोरे देवखोप गटातून विजयी झालेल्या भाजप उमेदवार अनुश्री पाटील तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेल्या आहेत बहुजन विकास आघाडीच्या ज्योत्स्ना पाटील चौथ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. दीड वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत नंदोरे देवखोप गटात शिवसेनेच्या उमेदवार नीता पाटील यांचा 94 मतांनी पराभव झाला होता. पोटनिवडणुकीत नीता पाटील यांनी पराभवाचे उट्टे काढून विजय खेचून आणला आहे.

हेही वाचा: ZP Election : धुळ्यावर भाजपचा झेंडा? अमरीश पटेल यांचं वर्चस्व कायम

भाजपकडून नंदोरे देवखोपची जागा कायम राखण्यासाठी जोर लावला होता.राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आदिवासी एकता परिषदेने आदिवासी उमेदवार दिल्याने निवडणुकीत रंगत वाढली होती. आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोंदडे यांनी प्रचारात उडी घेत प्रचाराचा धुरळा उडवला होता.

सावरे एम्बुर जिल्हा परिषद गट

शिवसेना विनया पाटील 6576

बविआ प्रांजळ पाटील 2941

भाजप सुवर्णा सांबरे 2577

CPM 956

काँग्रेस 353

Nota 224

■नंदोरे देवखोप

शिवसेना नीता पाटील 4072

राष्ट्रवादी काँग्रेस कविता खटाळी 3205

भाजप अनुश्री पाटील 2209

बविआ ज्योत्स्ना पाटील 2174

loading image
go to top