esakal | शिवसेनेला धक्का! वसईत पंचायत राज हितेंद्र ठाकूर यांच्याकडे
sakal

बोलून बातमी शोधा

MLA hitendra thakur

हितेंद्र ठाकूर यांच्याकडे पंचायत राज आल्याने सेनेची कोंडी झाली आहे.

शिवसेनेला धक्का! वसईत पंचायत राज हितेंद्र ठाकूर यांच्याकडे

sakal_logo
By
प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा

वसई (मुंबई): वसई पंचायत समितीच्या भाताणे व तिल्हेर या दोन गणासाठी पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीने वर्चस्व निर्माण केले आहे. हितेंद्र ठाकूर यांच्याकडे पंचायत राज आल्याने सेनेची कोंडी झाली आहे. भाताणे गणातून अशोक आत्माराम पाटील तर तिल्हेर याठिकाणाहून गीता पाटील यांनी विजयश्री खेचून आणली आहे.

हेही वाचा: वसई-विरार शहरात गळती काही थांबेना; हजारो लिटर पाणी वाया

वसई तालुक्यात राजकीय श्रेयाची लढाई होती भाजपने उडी घेत आमचे उमेदवार निवडणूक येणार ओबीसी बाबत राजकीय निशाणा देखील साधत दोन्ही उमेदवार ओबीसींचे दिले होते, परंतु भाजपला धक्का बसला असून बहुजन विकास आघाडीने राजकीय सारीपाटात बाजी मारल्याने वसई पंचायत समितीवर राजकीय बलाबल वाढले आहे. बहुजन विकास आघाडीच्या 5, भाजप 2 व शिवसेना 1 असे झाले असल्याने पंचायत समिती सभापतीपद बविआकडे जाणार असून, पक्षाचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर कोणाची वर्णी लावणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: वसई : परदेशी नागरिकांकडून अमली पदार्थ जप्त

आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी अफाट मेहनत घेतली व मतदारांनी देखील चांगला कौल दिला. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची कामे करण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राजेश पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

loading image
go to top