esakal | उद्धव ठाकरेंकडून भाजपसोबतची बैठक रद्द 
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena leader uddhav thackeray cancelled his meeting with bjp sanjay raut

भाजप आणि शिवसेना यांच्या नेत्यांची बैठक मंगळवारी दुपारी 4 वाजता होणार होती, परंतु "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युल्यावर चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्री सांगत असतील तर, बैठकीत कशावर चर्चा करायची, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला.

उद्धव ठाकरेंकडून भाजपसोबतची बैठक रद्द 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी भाजपने मंगळवारी बोलावलेली बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्याचे समजते. सत्तेत "निम्मा-निम्मा' वाटा फॉर्म्युला ठरलाच नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यानंतर शिवसेनेने बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला.

...तर पुन्हा महायुतीचे सरकार येण्याची शक्यता धूसर : रामदास आठवले
प्रस्ताव आल्यास विचार करू; पृथ्वीराज चव्हाण यांनी खुले केले दरवाजे

बैठकीत चर्चा कशावर करायची?
भाजप आणि शिवसेना यांच्या नेत्यांची बैठक मंगळवारी दुपारी 4 वाजता होणार होती, परंतु "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युल्यावर चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्री सांगत असतील तर, बैठकीत कशावर चर्चा करायची, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही बैठकच रद्द केली असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री नक्की काय म्हणाले, हे माहीत नाही. "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युल्यावर चर्चाच झाली नसल्याचे ते म्हणत असतील, तर सत्याची व्याख्याच बदलायला हवी. मुख्यमंत्री बोलत आहेत त्यावर भाजप आणि शिवसेनेत काय चर्चा झाली हे सर्वांना माहिती आहे. त्या ठिकाणी माध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते असे राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांचा निवडणुकीतला खर्च किती?
कोणता पक्ष कोणाला निवडणार विधीमंडळ गटनेता?; उत्सुकता शिगेला

भाजप आमदारांची उद्या बैठक
दरम्यान, भाजपच्या आमदारांची एक बैठक उद्या (30 ऑक्टोबर) मुंबईत होत आहे. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पक्षाचे अध्यक्ष अविनाश राय खन्ना यांना दिल्लीहून पाठवले आहे. तोमर आणि खन्ना यांची केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन नेते उद्या भाजपच्या 105 आमदारांची बैठक घेतील.