शिवसेना-मनसेमध्ये व्हॉट्‌सऍपवर वाग्‌युद्ध 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मुंबई - युतीची टाळी न वाजल्यामुळे शिवसेना व मनसेमध्ये व्हॉट्‌सऍपवर महाभारत सुरू झाले आहे. व्हॉट्‌सऍपवर एकमेकांविरोधात मेसेज पाठवून खिल्ली उडवली जात आहे. अखेर व्हॉट्‌सऍपवरील मेसेज ही पक्षाची भूमिका नाही, असा खुलासा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करावा लागला. 

भाजपबरोबरची युती तुटल्याचे जाहीर होताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला. त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही. दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते एकत्र येण्याची भूमिका आधी मांडत होते. उद्धव यांनी टाळी नाकारल्याचे कळताच मनसेची खिल्ली उडवणारे मेसेज व्हॉट्‌सऍपवर फिरू लागले. "आता वेळ निघून गेली आहे. तुम्ही पक्षच शिवसेनेत विलीन करा' असा सल्ला देणारा मेसेज फिरू लागला. "शिवसेनेच्या विरोधात मराठी उमेदवार देऊ नका' असे भावनिक आवाहन करणारा मेसेजही व्हॉट्‌सऍपवर फिरत होता. 

या मेसेजना मनसेच्या कार्यकर्त्यांनीही थेट उत्तरे दिली. मनसेने शिवसेनेच्या नेत्यांकडे प्रस्ताव दिला होता; मात्र तो पक्षप्रमुखांपर्यंत पोहचलाच नाही. हे झारीतील शुक्राचार्य कोण, असा सवाल विचारणारे मेसेज मनसेकडून फिरू लागले. अहंकारी व्यक्तीला त्याचा अहंकारच मारतो, अशा आशयाचा मेसेजही होताच. सकाळपासून दुपारपर्यंत शिवसेना-मनसेची व्हॉट्‌सऍपवर जुंपली होती. दुपारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे मेसेज म्हणजे शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर हा वाद थांबला.

Web Title: Shiv Sena-MNS whatsapp