esakal | हाथरस घटना - अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा बलात्कार होतोय असं म्हटल तर कुणाला मिरच्या झोंबू नयेत - संजर राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

हाथरस घटना - अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा बलात्कार होतोय असं म्हटल तर कुणाला मिरच्या झोंबू नयेत - संजर राऊत

हाथरस मधील घटनेचे तीव्र पडसाद सर्व देशभरात उमटताना पाहायला मिळतात.

हाथरस घटना - अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा बलात्कार होतोय असं म्हटल तर कुणाला मिरच्या झोंबू नयेत - संजर राऊत

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : हाथरस मधील घटनेचे तीव्र पडसाद सर्व देशभरात उमटताना पाहायला मिळतात. काल काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हाथरस मधील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास गेले असता रस्त्यात पोलिसांकडून राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. एकंदर हाथरसमधील भयंकर घटना आणि काल राहुल गांधी यांना करण्यात आलेली धक्काबुक्की यावर संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलंय. एकीकडे त्या पीडित मुलीने कॅमेरावर सांगितलंय की तिच्यावर बलात्कार झालाय मात्र पोलिस बलात्कार नाही असं सांगतायत. त्यामुळे हा लोकशाहीवरील सामूहिक बलात्कार आहे अशी तीव्र टीका शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय

संजय राऊत म्हणालेत की, मीडियावर हल्ले होतायत, मीडियाला रोखलं जातंय. त्यावर सुद्धा गँगरेप करण्याचा प्रयत्न होतोय. एखादी अशी घटना घडते, तेंव्हा मीडियाने जे खरंच घडत आहे ते लोकांसमोर आणावं, नाहीतर अफवा पसरतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. हे कोणत्याही सरकारला समजायला हवं. म्हणून मीडियाला तिथे जाऊ द्यायला हवं. 

महत्त्वाची बातमी : महाराष्ट्रात बलात्कारासह हत्येचे सर्वाधिक गुन्हे; महिलांविरोधात घडलेल्या गुन्ह्यांत राज्य तिसऱ्या क्रमांकावर

पुढे राऊत म्हणालेत की, पहाटे दोन वाजता हाथरसच्या कन्येवर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला गेला, अंत्यसंस्कार नाही केले. त्याला जर कुणी अंत्यसंस्कार म्हणत असेल तर त्यांनी हिंदू धर्माचे ग्रंथ वाचावेत. जे सरकार स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणतंय त्यांनी ते वाचावं. रात्रीच्या अंधारात त्या मुलीचा मृतदेह जाळला ते अंत्यसंस्कार होते की पाप जाळण्याचा प्रयत्न केला गेला, हे पाहण्यासाठी मीडिया तिथे गेला आणि त्या माध्यमातून जे सत्य लोकांसमोर आलं. म्हणून पुढे या हालचाली झालेल्या आहेत. 

उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री भगवे कपडे घालतात. ते संन्याशी आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. रामाचं मंदिर अयोध्येत आहे. सीतामाई त्यात आहे . त्या सीतामाईची पूजाही पंतप्रधान आणि योगींच्या हस्ते झाली. आज हाथरसच्या मुलीच्या किंकाळ्या ऐकून सीतामाई देखील म्हणत असेल की, पुन्हा एकदा मला धरणी दुभंगून पोटात घ्या. असा आक्रोश सीतामाई करत असेल. 

महत्त्वाची बातमी : 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये मुंबई एक स्थान वर, गुन्हेगारीत मुंबई तिसऱ्या स्थानावर

देशात एक प्रकारचा सन्नाटा आहे. लोकांना व्यक्त व्हायचंय पण लोकांना भीती वाटतेय. अशा प्रकारची बोलण्याबाबत भीती असणं चांगलं नाही. ज्या प्रकारे त्या मुलीला गळा दाबून मारण्यात आलं असं ती सांगतेय. त्याच प्रकारे या देशातील मोठ्या समाजाच्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही गळा दाबला जातोय, बलात्कार होतोय असं म्हंटल तर कुणाला मिरच्या झोंबू नयेत.

shiv sena MP sanjay raut on hathras case says its murder of freedom of speech