Aditya Thackeray: वोटचोरी अन् बोगस मतदान...; निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा 'राहुल गांधी पॅटर्न'! मतदार यादीवरून मोठे खुलासे

Aaditya Thackeray Speech News: आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वरळीमध्ये मतदार यादीत फेरफार झाल्याचा आरोप केला आहे. ते आज शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते.
Aaditya Thackeray

Aaditya Thackeray

ESakal

Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज वरळीच्या डोम येथे निर्धार मेळावा पार पडला. यावेळी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व उपशाखाप्रमुख या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरेंनी मेळाव्यातून उपशाखाप्रमुखांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी बोगस मतदारयादीवरून सरकारला चांगलंच धारेवर धरले आहे. आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com