शिवसेनेलाही हवी भाजपशी युती; पण...

मृणालिनी नानिवडेकर
सोमवार, 24 डिसेंबर 2018

भाजपने लोकसभा एकत्रितपणे लढून विधानसभेत वेगळे लढायची आगळीक करू नये यासाठी दोन्ही निवडणुका एकाच वेळी हव्यात, असाही शिवसेनेतील आमदारांचा आग्रह आहे.

मुंबई : भाजपसमवेत एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्यातच पक्षाचे हित असल्याची बहुतांश शिवसेना खासदार-आमदारांची भूमिका आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच शब्द अंतिम असेल, असे सांगतानाच एकत्र लढण्यातच फायदा असल्याचे कोष्टक मांडले जाते आहे. 

भाजपने लोकसभा एकत्रितपणे लढून विधानसभेत वेगळे लढायची आगळीक करू नये यासाठी दोन्ही निवडणुका एकाच वेळी हव्यात, असाही शिवसेनेतील आमदारांचा आग्रह आहे. मात्र 1999 प्रमाणे दोन्ही निवडणुका एकत्र घेऊन सत्ता गमावण्याची वेळ आली होती, ते टाळावे, असे काही ज्येष्ठ मंत्र्यांचे मत आहे. 

एकत्रित निवडणुकीबाबत काहीही बोलण्याची ही वेळ नाही. सध्या आम्ही पंढरपूर वारीच्या तयारीत आहोत, असे शिवसेनेतर्फे सांगण्यात येते आहे. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा, ही प्रार्थना राममंदिराबरोबरच केली जाणार आहे, असे एकाने स्पष्ट केले.

भाजपने तीन राज्यांतील सत्ता गमावली असली तरी छत्तीसगड वगळता अन्यत्र दारुण पराभव झालेला नाही. हिंदुत्ववादी मतांनी एकत्र राहाणे आवश्‍यक असल्याचे शिवसेनेतील काहींना वाटते. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जानेवारीत सरकारचा पाठिंबा काढून घेतला जाईल, असे घोषित केले होते. त्यामुळे शिवसेनेत सध्या आगामी घडामोडींबद्दल उत्सुकता आहे. मातोश्रीवर भेटीला जाणारे आमदार तसेच खासदारही याबाबत नेतृत्वाशी चर्चा करत असतात. 

भाजपच्या सर्व नेत्यांनी युती आवश्‍यक असल्याची भूमिका घेतली असल्याने शिवसेना जागांच्या आकड्याबाबत आग्रही राहू शकेल, असेही सांगण्यात येते आहे. भाजपला सोडण्याची नव्हे, तर नामोहरम करण्याची ही वेळ आहे, असे लोकप्रतिनिधींना वाटते. 

सारे विठ्ठलदर्शनानंतर 
एकत्रित निवडणुकीबाबत काहीही बोलण्याची ही वेळ नाही. सध्या आम्ही पंढरपूर वारीच्या तयारीत आहोत, असे शिवसेनेतर्फे सांगण्यात येते आहे. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा, ही प्रार्थना राममंदिराबरोबरच केली जाणार आहे, असे एकाने स्पष्ट केले.

भाजपातील एका ज्येष्ठ नेत्याने मात्र शिवसेनेने विधानसभेत अर्ध्या म्हणजेच 144 किंवा त्यापेक्षा जास्त जागांची मागणी केल्यास ती पूर्ण करणे योग्य ठरेल का? असा प्रश्‍न केला आहे. 

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जानेवारीत सरकारचा पाठिंबा काढून घेतला जाईल, असे घोषित केले होते. त्यामुळे शिवसेनेत सध्या आगामी घडामोडींबद्दल उत्सुकता आहे.

आघाडीत एकवाक्‍यता 
भाजपविरोधी ऐक्‍याचे प्रदर्शन व्हावे यासाठी समविचारी पक्षांना सामावून घेण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये एकवाक्‍यता आहे. समाजवादी पक्ष, शक्‍य झाल्यास बहुजन समाज पक्ष आणि प्रकाश आंबेडकरांना समवेत घेण्याची सहमती नुकत्याच झालेल्या बैठकीत व्यक्‍त करण्यात आली.

Web Title: Shiv Sena ready for alliance with BJP for Lok Sabha 2019 elections